24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रसमरजीतसिंह घाटगेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

समरजीतसिंह घाटगेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणा-या कागल तालुक्यातील राजकारण सध्या तापले आहे. गेल्या आठवड्यात भाजपा नेते समरजीतसिंह घाटगे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीत श्रीरामाचा उल्लेख असल्याचा आक्षेप घेऊन गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला. तर सोमवारी हसन मुश्रीफ यांच्या गटाने कागल मधील श्रीराम मंदीराचा वापर समरजीत घाटगे यांच्याकडून राजकारणासाठी होत असल्याचा आरोप केला आहे. कार्यकर्ते आक्रमक झाले असून, गुन्हा दाखल करण्यासाठी मोर्चा काढला आहे. यावरून कागलमध्ये वातावरण तापले आहे.

मंत्री मुश्रीफ यांनी आपल्या कारखान्याच्या मान्यतेसाठी दिलेल्या प्रस्तावातील पॅन कार्डवर व त्यांच्या वेबपेजवर त्यांची जन्मतारीख २४ मार्च १९५४ अशी आहे. बहुजन समाजाला गेली चाळीस वर्षे ते फसवत आहेत. श्रीराम मंदिरासाठी पंधरा हजार रुपये राजेंनी दिल्याचे सांगून त्यांनी स्व.राजेंचा अपमान केला आहे. राम मंदिराच्या जागी आमचा वाडा होता हे विसरून चालणार नाही. तो वाडा पाडला आहे. मंत्री मुश्रीफ यांनी धर्मासाठी आपली एक गुंठातरी जागा दिली का? हे सांगावे. राममंदिरला दिलेले हे शासनाचे पैसे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान सोमवारी मुश्रीफ गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या