26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्रसरकारची भूमिका ढीम्म : वाघ

सरकारची भूमिका ढीम्म : वाघ

एकमत ऑनलाईन

पुणे – पुणे ही सावित्रीबाई फुले यांची भूमी आहे. रोज इथल्या मुलींना त्रास दिला जात आहे. या गोष्टींचे रोज नवे उच्चांक होत आहेत. शाळकरी मुलींवर अत्याचार होत आहेत. पोलिस यंत्रणा यासमोर हतबल झाली आहे. पुणे अत्याचाराचे माहेरघर आहे का? असा सवाल भाजपच्या चित्रा वाघ यांनी केला आहे. त्या पुणे येथे बोलत होत्या. राज्य सरकार हे जुगाडू आणि तडजोडीचे सरकार असल्याने कायदा, सुव्यवस्थेचे वाईट हाल सुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे.

त्या म्हणाल्या, महिलांची सुरक्षा वा-यावर आहे. राज्यात एकही जिल्हा असा नाही की, जिथे महिलांवर अत्याचार झाले नाहीत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे टांगली असल्याचे चित्र आहे. सरकारमधील मंत्र्यांचे हात बरबटलेले आहेत. संजय राठोड यांची हकालपट्टी झाली, मात्र त्यांच्यावर शून्य कारवाई झाली.

सरकारची भूमिका ढीम्म आहे. या सरकारने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे. आरोग्य विभाग परीक्षेची परिस्थितीही तशीच आहे. नगर येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेत जर डॉक्टर्स आणि नर्स आरोपी दाखवले आहेत, तर आरोग्यमंत्रीही दोषी आहेत.

राज्यातील एसटी संपाबाबत त्या म्हणाल्या, १४ दिवस झाले हे कर्मचारी लहान मुलांना घेऊन आंदोलनाला बसले आहेत. हे सरकार लोकधार्जिण नाही. आमच्या सरकारला धोका नाही असे एक सर्वज्ञानी रोज सकाळी येऊन सांगतात असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. दिवसातून या सरकारचे ३ मंत्री येऊन सरकार खंबीर आहे हे चेक करून जातात, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या