26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeआंतरराष्ट्रीयसरकारच्या निर्णयाचे स्वागत

सरकारच्या निर्णयाचे स्वागत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषि कायदे रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर आता परदेशामधूनही या निर्णयासंदर्भात प्रतिक्रिया येऊ लागल्यात. अमेरिकेमधील खासदार ऍण्डी लेविन हे सार्वजनिक मंचावरुन या संदर्भात प्रतिक्रिया देणा-या मोजक्या काही अमेरिकन नेत्यांपैकी एक ठरलेत. ऍण्डी यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात प्रतिक्रिया नोंदवली.

मोदी सरकारने मागे घेतलेला निर्णय हा या गोष्टाचा पुरावा आहे की भारत आणि जगामध्ये श्रमिक एकत्र आले तर ते कॉर्परेट हितांचा विचार करणा-यांना हरवून प्रगती करु शकतात. ऍण्डी लेविन यांनी आम्हाला इथे फार आनंद झाल्याचे म्हटले आहे. एका वर्षाहून अधिक काळापासून सुरु असणा-या विरोधानंतर अखेर भारतामधील तिन्ही कृषि कायदे रद्द करण्याचा निर्णय हा स्वागतार्ह असल्याचे ते म्हणालेत.

आंदोलनाची जगभरात चर्चा
भारतीय कृषि कायद्यांच्या मुद्याची चर्जा जगभरामध्ये झाली होती. अमेरिकन पॉप गायिका रिहानाने शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेल्या ट्विटवरुन देशामध्ये चांगलाच वाद निर्माण झाला होता. त्यामुळेच आता परदेशामधूनही या चर्चेत असणा-या विषयावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या