24.2 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयसरकारच्या निष्काळजीमुळे कोरोनात ४० लाख भारतीयांचा मृत्यू

सरकारच्या निष्काळजीमुळे कोरोनात ४० लाख भारतीयांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवार दि. १७ एप्रिल रोजी असा दावा केला की, सरकारच्या निष्काळजीमुळे कोरोना व्हायरस साथीच्या आजारादरम्यान ४० लाख भारतीयांचा मृत्यू झाला. यासह राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सर्व मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी केली.

ट्विटरवर, राहुल गांधी यांनी न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात दावा केला आहे की भारत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या सार्वजनिक करण्याबाबत डब्ल्यूएचओकडून केल्या जाणा-या प्रयत्नांमध्ये अडकाठी करत आहे. राहुल गांधी म्हणाले, मोदीजी खरे बोलत नाहीत आणि इतरांना बोलू देत नाहीत, तरीही ते खोटे बोलतात की ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणीही मरण पावले नाही. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पुढे म्हणाले की, मी यापूर्वीही सांगितले आहे. कोविडच्या काळात सरकारच्या दुर्लक्षामुळे पाच लाख नाही तर ४० लाख भारतीयांचा मृत्यू झाला. मोदीजी प्रत्येक पीडित कुटुंबाला प्रत्येकी ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणीही केली.

भारताने शनिवारी देशातील कोरोना मृत्यू दराचा अंदाज लावण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या(डब्ल्यूएचओ) कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि असे म्हटले की, अशा गणितीय मॉडेलिंगचा वापर भौगोलिक आकार आणि लोकसंख्येच्या इतक्या विशाल देशात मृत्यूच्या आकडेवारीचा अंदाज लावण्यासाठी केला जाऊ शकत नाही.

डब्ल्यूएचओला अडचणी सांगितल्या
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १६ एप्रिल रोजी इंडिया इज स्टालिंग डब्लूएचओज एफर्ट्स टू मेक ग्लोबल कोविड डेथ टोल पब्लिक या शीर्षकाखाली लिहिण्यात आलेल्या लेखाच्या उत्तरात एक निवेदन जारी केले होते. त्या निवेदनात म्हटले आहे की देशाने अनेक प्रसंगी वापरल्या जाणा-या कार्यपद्धतीबद्दल जागतिक आरोग्य संस्थेला आपल्या अडचणी सांगितल्या आहेत.

वास्तविक आकडेवारी जाहीर केली नाही
सरकारने कोरोना मृत्यूची वास्तविक आकडेवारी जाहीर केली नसल्याचा आरोप काँग्रेसने केला असून मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली आहे. रविवारी अपडेट झालेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, चार नवीन मृत्यूंसह कोविडमुळे मृतांची संख्या 5,21,751 वर पोहोचली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या