22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeमहाराष्ट्रसरकार तुमचेच आहे पण त्याला लुटू नका

सरकार तुमचेच आहे पण त्याला लुटू नका

एकमत ऑनलाईन

बारामती : सरकार तुमचंच आहे पण सरकारला लुटू नका असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतक-यांना दिला आहे. बारामतीतील माळेगाव राजहंस संकुल संस्थेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत हा सल्ला दिला आहे. रस्ता रुंदीकरणाच्या मुद्यावरून बोलताना अजित पवार यांनी याबाबत भाष्य केले आहे.

रस्ता रुंदीकरणामध्ये शेतकरयांनी रस्त्याच्या बाजूला झाडे लावली आहेत. जो जमिनीचा भाग रस्ता रुंदीकरणात जाणार आहे त्याच ठिकाणी लोकांनी झाडं लावली आहेत. दुस-या बाजूला झाडे लावलेली नाहीत. मी प्रांताधिकारी यांना विचारलं तर त्यांनी आंबा, नारळ याची झाडं लावली की जास्त पैसे मिळतात. त्यामुळे लोकं अशी झाडं लावतात असे सांगितले. त्यावर अजित पवार यांनी सरकार पण तुमचंच आहे सरकारला लुटू नका असा शेतक-यांना सल्ला दिला.
‘‘सरकार तुमचेच आहे पण सरकारला लुटू नका. जेवढे नियमाने पाहिजे तेवढे घ्या. झाड, विहीर असेल तर त्याचा मोबदला घ्या पण अशा पद्धतीने झाडे लावून मोबदला घेणे बरोबर नाही.

आम्ही जाताना कुणाचे काय सुरू आहे हे बघत असतो. शेवटी हा जनतेचा पैसा आहे. सरकार कुठे नोटा छापत नाही. कराच्या रूपातून आलेल्या पैशातूनच ही सर्व कामे केली जातात. त्याची जाणीव आपण ठेवावी,’’ असे अजित पवार यांनी म्हटले.

‘‘एसटीच्या संदर्भात अनेक मार्ग काढायचा प्रयत्न आम्ही केला आहे. एसटी कर्मचा-यांना पाच, सहा आणि सात हजार रुपयांची पगारवाढ दिली आहे. विलीनीकरणाबाबत समिती नेमली आहे. पण आता शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना आणि गोरगरिबांना एसटी लागते. अनेक राज्यांचा आढावा घेतला त्यापेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न केला. एसटी कर्मचारीदेखील आपलेच आहेत. पण आजही काही जणांना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, विलीनीकरण करा असेच सांगून चालत नाही,’’ असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या