18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयसब-ऑर्डिनेट प्रथेची मानसिकता बदला

सब-ऑर्डिनेट प्रथेची मानसिकता बदला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : हायकोर्टातील न्यायाधीश जिल्हा न्यायालयांना सब-ऑर्डिनेट मानतात. यातून वसाहतवादी मानसिकता दिसते. ही विचारसरणी बदलण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत देशाचे सर न्यायाधिश डी. वाय. चंद्रचूड यांनी बुधवारी येथे नोंदविले.

सुप्रीम कोर्टातील बार असोसिएशनच्या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना उद्देषून सरन्यायाधिश चंद्रचूड म्हणाले
हाताखालचे लोक ही संस्कृती आपणच वाढवली. पायाभूत रचनेत सुधारणांनी ती बदलणार नाही. त्यासाठी मानसिकता बदलावी लागेल. सब-ऑर्डिनेट संस्कृतीला आपणच प्रोत्साहन दिले. आपण जिल्हा न्यायालयांना कनिष्ठ न्यायालये संबोधतो. न्यायाधीशांना कनिष्ठ अथवा सबऑर्डिनेटच्या रूपात बोलवले जाऊ नये. अनेक ठिकाणी अशी परंपरा आहे, की जेव्हा उच्च न्यायालयातील न्यायाधीश जेवत असतात तेव्हा जिल्हा न्यायाधीश जवळ उभे असतात. उच्च न्यायालयांतील न्यायाधीशांना ते जेवण वाढण्याचा प्रयत्न करतात. जिल्हा न्यायालयांचा दौरा करताना मी याचा अनुभव घेतला. जिल्हा न्यायाधीशांना जेव्हा बैठकांसाठी बोलावले जाते तेव्हा ते उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांसमोर बसण्याचेही धाडस करू शकत नाहीत. ही उदाहरणे वसाहतवादी मानसिकतेचे प्रतीक आहेत. हे बदलावे लागेल.
समान न्यायप्रणालीचा विचार आपल्याला आचरणात आणावा लागेल. हे केवळ जिल्हा स्तरावर पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून शक्य होणार नाही. यासाठी मानसिकता बदलावी लागेल.

बदलाची सुरुवात व्हावी जिल्हा स्तरावरून
न्यायपालिकेतही तरुणांच्या वाढत्या सहभागामुळे पिढीत बदल होतोय. तरुण आयएएस अधिकारी वरिष्ठांकडे तुच्छतेने पाहत नाही. दोघांमध्ये बरोबरीच्या नात्याने चर्चा, संवाद होतो. यावरून देशाची वाटचाल कळते. आजकालचे तरुण सुशिक्षित, आत्मविश्वासू, महत्त्वाकांक्षी आणि स्वाभिमानी आहेत. न्यायपालिकेतही हा बदल होत आहे. यापूर्वीच्या पिढीतील कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश माझ्याशी बोलताना वाक्यागणिक ‘हो, सर, जी सर’ म्हणायचे. आपल्याला यात बदल घडवायचा असेल तर सर्वात आधी जिल्हा पातळीवर न्यायपालिकेचा चेहरामोहरा बदलावा लागेल, असा सल्ला त्यांनी दिला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या