28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeसरसंघचालक भागवतांनी घेतली इमामांची भेट

सरसंघचालक भागवतांनी घेतली इमामांची भेट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आज (गुरुवार) अखिल भारतीय मुस्लिम इमाम संघटनेचे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी यांच्यासह अन्य मुस्लिम नेत्यांची भेट घेतली. दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीत ही बैठक झाली.

इमाम इलियासी आणि भागवत यांच्यात ही बैठक बंद खोलीत झाली, ती सुमारे तासभर चालली. भागवत यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी कृष्ण गोपाल, रामलाल आणि इंद्रेश कुमारही उपस्थित होते.

यापूर्वी, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी आणि दिल्लीचे माजी उपराज्यपाल नजीब जंग यांच्यासह मुस्लिम विचारवंतांच्या पाच सदस्यीय गटाने भागवत यांची भेट घेतली होती.
आरएसएसचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी याबाबत सांगितले की, आरएसएसचे सरसंघचालक सर्व स्तरातील लोकांना भेटतात. हा चालू असलेल्या सामान्य संवाद प्रक्रियेचा भाग आहे.

हिंदू-मुस्लिम ऐक्यावर भर
आरएसएसने अलीकडे मुस्लिमांशी संपर्क वाढवला असून भागवत यांनी समाजातील नेत्यांच्या अनेक बैठका घेतल्या आहेत. यापूर्वी २२ ऑगस्ट रोजी संघप्रमुख भागवत यांनी मुस्लिम विचारवंतांच्या पाच सदस्यीय चमूची भेट घेतली होती. ही बैठक सुमारे दोन तास चालली. या बैठकीत देशातील जातीय सलोखा मजबूत करणे आणि हिंदू-मुस्लिम यांच्यातील वाढते अंतर कमी करणे यावर भर देण्यात आला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या