29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमनोरंजनसर्वांची उत्कृष्ट कामगिरी

सर्वांची उत्कृष्ट कामगिरी

एकमत ऑनलाईन

मुंबई : १९८३ च्या विश्वचषक विजय गाथेवर बनलेला ‘८३’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. कपिल देव यांच्या भूमिकेत अभिनेता रणवीर सिंग आहे. या चित्रपटात रणवीरने कपिल देव यांची, तर दीपिका पदुकोण हिने कपिल देव यांच्या पत्नी रोमी देवची भूमिका साकारली आहे. १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्याची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

‘८३’ हा चित्रपट पाहिल्यानंतर विराट कोहलीने ट्विट करून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोहलीने ट्विट केले आहे की, ‘‘भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत प्रतिष्ठित क्षण यापेक्षा चांगला अनुभवता आला नसता, एक काल्पनिकरीत्या बनवलेला चित्रपट जो तुम्हाला १९८३ च्या विश्वचषकातील घटना आणि भावनांमध्ये विसर्जित करतो, सर्वांची उत्कृष्ट कामगिरी.’’ विराटने आपल्या ट्विटमध्ये रणवीर सिंगचेदेखील कौतुक केले आणि दिग्दर्शक कबीर खानला उत्तम चित्रपट बनवल्याबद्दल शुभेच्छाही दिल्या.

डोळ्यांत पाणी आले : शास्त्री
टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री यांना एका कार्यक्रमात ‘इक्बाल’, ‘लगान’, ‘धोनी’ आणि ‘८३’ यापैकी एका चित्रपटाची निवड करण्यास सांगण्यात आले. त्यावर रवी शास्त्री यांनी क्षणाचाही विलंब न लावता ८३असे उत्तर दिले. ‘८३’ चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यांत पाणी आलं. हा चित्रपट पाहून काही आठवणी ताज्या झाल्या, माझ्या डोळ्यांत पाणी होते’ असे रवी शास्त्री यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या