18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयटी.एन. शेषन यांच्यासारख्या मुख्य निवडणूक आयुक्तांची गरज

टी.एन. शेषन यांच्यासारख्या मुख्य निवडणूक आयुक्तांची गरज

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : संविधानाने मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्तांच्या खांद्यावर प्रचंड मोठी जबाबदारी दिली आहे. असे असताना टी.एन. शेषन यांनी घटनेच्या चौकटीत राहून घेतलेल्या कठोर निर्णयांनी आजही आपली छाप सोडली आहे. अशा मुख्य निवडणूक आयुक्तांची आजही गरज आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदविले.

एका याचिकेवर सुनावणी देताना न्या. अजय रस्तोगी, अनिरुद्ध बोस, हृषिकेश राय आणि सी टी रविकुमार यांच्या खंडपीठाने मुख्य निवडणूक आयुक्त शेषन यांची आठवण काढली.

खंडपीठ म्हणाले, देशात अनेक मुख्य निवडणूक आयुक्त झाले आहेत. मात्र शेषन यांच्या सारखे अधिकारी क्वचितच घडतात. या पदासाठी आपल्याला सर्वोत्तम व्यक्ती शोधावी लागेल. अशी व्यक्ती निवडणे आणि त्याची नेमणूक करणे असा प्रश्न न्यायालयाला पडला आहे.

१८ वर्षांत १४ मुख्य निवडणूक आयुक्त
देशात २००४ पासून एकही मुख्य निवडणूक आयुक्त आपला ६ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकलेला नाही, हा मुद्दा टिप्पणीत अधोरेखित करीत खंडपीठ म्हणाले, यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळात ६ आणि एनडीए सरकारच्या ८ वर्षांत ८ मुख्य निवडणूक आयुक्त झाले.

म्हणून निघाली शेषन यांची आठवण

खंडपीठ म्हणाले, टी.एन. शेषन हे तामिळनाडू केडरचे १९५५ च्या बॅचचे प्रशासकीय सेवा अधिकारी. त्यांनी २७ मार्च १९८९ ते २३ डिसेंबर १९८९ पर्यंत भारताचे १८ वे कॅबिनेट सचिव म्हणून काम केले. त्यानंतर १२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६ पर्यंत ते भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सेवा दिली. मुख्य निवडणूक आयुक्त काय करू शकतो, हे घटनेच्या चौकटीतून त्यांनी सिद्ध करून दाखविले. त्यांच्या कार्यकाळात बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत बूथ कॅप्चरिंगचा डाग पुसून काढला. शेषन यांच्यामुळे देशातील जनतेला, निवडणुका कोण चालवतात? त्याचे नियम काय हे कळले.

कॉलेजियम प्रणालीचा विरोध
मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या निवडीसाठी कॉलेजियम सारखी प्रणाली लागू करावी, यासाठी २३ ऑक्टोबर २०१८ ला सर्वोच्च न्यायालयात ५ न्यायमुर्तींच्या खंडपीठाकड जनहित याचिका पाठविण्यात आली होती. त्यावर केंद्र सरकारने १७ नोव्हेंबरला या याचिकेला विरोध करीत असा प्रयत्न म्हणजे घटनादुरुस्ती असल्याचा युक्तीवाद केला होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या