28.8 C
Latur
Saturday, February 4, 2023
Homeआंतरराष्ट्रीयसलग दहाव्यांदा इंग्लंड विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत

सलग दहाव्यांदा इंग्लंड विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत

एकमत ऑनलाईन

दोहा : कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने सोमवारी सेनेगलचा ३-०ने पराभव करीत विजय सेलिब्रेट केला. हा संघ विश्वचषकात सलग दुस-यावेळी टॉप-८मध्ये तर सलग १० व्यांदा उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. इंग्लंडचा सामना आता गतविजेत्या फ्रान्सशी होणार आहे.

यापूर्वी इंग्लंडने १९५४ , १९६२, १९६६, १९७०, १९८६, १९९०, २००२, २००६, २०१८ आणि आता २०२२ च्या हंगामात उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र, इंग्लंडला फक्त १९६६ मध्येच विश्वचषकाची ट्रॉफी उचलण्याची संधी मिळाली. उर्वरित प्रसंगी संघ बाद फेरीत पराभूत झाला.

हॅरी केनच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने अल बेट स्टेडियमवर सेनेगलचा ३-० असा पराभव केला. सेनेगलच्या विरूद्ध २० वर्षांनंतर विश्वचषकातील एका सामन्यात तीन गोल झाले. याआधी २००२मध्ये उरुग्वेविरुद्ध असा प्रकार घडला होता. तो ३-३ असा बरोबरीत सुटला.

इंग्लंडने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व राखले. त्याने गोलचे ४ प्रयत्न केले. यातील ३ मध्ये त्यांना यश मिळाले. तर सेनेगलला एकच संधी मिळाली. पण, तीही हुकली.

ज्युडच्या असिस्टवर जॉर्डनने ३८ व्या मिनिटाला इंग्लंडसाठी पहिला गोल केला. त्यानंतर ४८व्या मिनिटाला हॅरी केनने फोडेनच्या पासवर गोल करत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्याचवेळी, ५७ व्या मिनिटाला साकाने फोडेनच्या पासवर गोल करून इंग्लंडचा विजय निश्चित केला.

आतापर्यंत ४ संघ उपांत्यपूर्व फेरीत
आतापर्यंत ४ संघांनी उपांत्यपूर्व फेरीत स्थान पक्के केले आहे. बाद फेरीच्या पहिल्या दिवशी नेदरलँड्सने अमेरिकेचा ३-१असा पराभव केला. दुस-या सामन्यात अर्जेंटिनाने ऑस्ट्रेलियाचा २-१ असा पराभव करत टॉप-८ मध्ये स्थान मिळवले. तर, फ्रान्सने पोलंडचा ३-१ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आणि इंग्लंडने सेनेगलचा पराभव केला. उर्वरित चार संघ प्री-क्वार्टर फायनलच्या उर्वरित सामन्यांद्वारे निश्चित केले जातील.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या