19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeराष्ट्रीयसहमतीने ठेवलेले संबंध लैंगिक छळ नाही

सहमतीने ठेवलेले संबंध लैंगिक छळ नाही

एकमत ऑनलाईन

थिरुवनंतपूरम : आधीच विवाहित असलेल्या महिलेला लग्नाचे वचन हा बलात्काराच्या खटल्याचा आधार असू शकत नाही. सोबतच सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध लैंगिक छळात मोजता येणार नाहीत, असा निर्वाळा केरळ उच्च न्यायालयचे न्या. कौसर एडप्पागथ यांच्या खंडपीठाने दिला.

कोल्लम येथील पुनालूरच्या रहिवासी टिनो थँकचान (२५) याच्याविरुद्ध कलम ३७६ (बलात्कार), ४१७ (फसवणूक) आणि ४९३ अंतर्गत नोंदवलेला बलात्काराचा खटला रद्द करताना खंडपीठाने मंगळवारी २२ नोव्हेंबरच्या सुनावणीत हे निरीक्षण नोंदवले.

लग्नाचे खोटे आश्वासन देऊन आरोपीने अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याने न्याय मिळवून देण्याची याचिका पीडीत महिलने केरळ उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने सांगितले की, पीडितेचे प्रियकरासोबत स्वेच्छेने संबंध होते.

विवाहित महिलेशी लग्नाचे वचन कायद्याने लागू होत नाही. वचन कायद्याने अंमलात आणण्यायोग्य नाही. येथे लग्नाच्या वचनाचा प्रश्नच उद्भवत नाही. कायदेशीररीत्या त्या तरुणाशी तिचे लग्न शक्य होणार नाही हे, महिलेला चांगलेच ठाऊक होते. कारण तो आधीच विवाहित होता. जर एखाद्या पुरुषाने एखाद्या महिलेशी लग्न करण्याचे वचन मोडले तर संमतीने लैंगिक संबंध ठेवणे हा कलम ३७६ नुसार गुन्हा ठरणार नाही.

पतीपासून वेगळी राहतेय महिला
विवाहित असूनही ही महिला पतीपासून वेगळी राहत असून घटस्फोटाची कारवाईही सुरू आहे. आरोपीविरुद्धचा खटला फेटाळताना न्यायालयाने सांगितले की, सहमतीने संबंध लैंगिक छळ होत नाही, त्यामुळे या प्रकरणाचा पुढील पाठपुरावा करून कोणताही हेतू साध्य होणार नाही.

काय आहे प्रकरण?
आरोपी आणि पीडितेची ऑस्ट्रेलियात सोशल मीडियाच्या माध्यमातून भेट झाली आणि त्यांच्या नात्याचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णयही घेतला. मात्र, लग्न होऊ शकले नाही. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिने आरोपीच्या लग्नाच्या आश्वासनावर भरवसा ठेवून संबंधास संमती दिली होती. या प्रकरणी २०१८ मध्ये पुनालूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या