16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeउस्मानाबादसहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश तायडे अखेर निलंबित

सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश तायडे अखेर निलंबित

एकमत ऑनलाईन

 उस्मानाबाद : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील ग्रामपंचायती मार्फत झालेल्या सार्वजनिक शोषखड्डेच्या १ कोटी १२ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात तत्कालीन गट विकास अधिकारी सुरेश तायडे यांना विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांनी बुधवाी अखेर निलंबित केले.
तायडे यांच्या विभागीय चौकशीसाठीचा प्रस्ताव पुराव्याच्या कागदपत्रासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्फत तात्काळ पाठवावा आदेशही विभागीय आयुक्तांनी दिले.

शोषखड्डे घोटाळ्याचे मास्टर माईंड असलेले तायडे यांचे अखेर निलंबन झाले आहे. या घोटाळ्यात आतापर्यंत ८ जणांवर कारवाई झाली आहे. हे प्रकरण गंभीर असल्याने तायडेंसह घोटाळ्यातील ग्रामसेवकांवर सेवा समाप्तीची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

खेड, बेंबळी, मेडंिसगा, ढोकी व उपळा येथे या शोषखड्यांची कामे झाली होती. यात १कोटी १२ लाख २८ हजार रुपयांचा अपहार झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी विभागीय आयुक्तांना दिला होता.
तत्कालीन गट विकास अधिकारी यांच्यावर गैरव्यवहारबाबत निलंबन आणि शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस जिल्हाधिका-यांनी केली होती.

या घोटाळा प्रकरणात उस्मानाबाद पंचायत समितीचे तांत्रिक सहायक राकेश पांडुरंग सगर व स्वाती रोहिदास कांबळे यांची सेवा समाप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर ग्रामसेवक ए. व्ही. आगळे व एस. बी. सुर्वे यांना दोषी ठरवत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ग्रामरोजगार सेवक रितापुरे, शित्रे व माने यांना कामावरून कमी करण्यात आले आहे.

मृत व्यक्ती दाखविल्या मजूर
खेड (ता. उस्मानाबाद) येथे रोहयो कामात चक्क मृत व्यक्तींची कामे मजूर म्हणून दाखविली गेली. या मयतांनी कामाची देखील मागणी ग्रामपंचायतीकडे कागदोपत्री केली आहे. काही कामावर असलेले रोहयो मजूर पुणे, मुंबई सारख्या शहरात कामाला आहेत. तरी देखील त्यांची नावे मजूरांच्या यादीत होती.

जानराव यांचा अहवाल गायब?
शोषखड्डे योजनेत घोटाळा होत असल्याची या घोटाळ््याची कुणकुण लागताच रोजगार हमीचे पंचायत समितीतील सहायक कार्यक्रम अधिकारी नितेश जानराव यांनी २४ मार्च २०२२ ला गटविकास अधिका-यांना लेखी माहिती दिली. मात्र त्याकडे भ्रष्ट अधिका-यांनी दुर्लक्ष केले. या बाबतीत उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांना विचारले असता जानराव यांचे कुठलेही पत्र कार्यालयाकडे आलेले नाही, असे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे हा अहवाल कुठे गायब झाला की केला, हे गुलदस्त्यात आहे. हा घोटाळ्यातला प्राथमिक पुरावा आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या