29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रसाहित्य संमेलनाचे ३ डिसेंबर रोजी उद्घाटन

साहित्य संमेलनाचे ३ डिसेंबर रोजी उद्घाटन

एकमत ऑनलाईन

नाशिक : नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा ३ डिसेंबर रोजी होणार आहे. कुसुमाग्रज नगरी येथे होणा-या या संमेलनाची तयारी करण्यात आली असून, सकाळी ८ वाजता ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून सुरू होणा-या ग्रंथदिंडीपासून साहित्य संमेलनाची सुरुवात होणार आहे.

त्यामुळे उद्यापासून नाशिक नगरीत साहित्यिकांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक नगरी सजली असून, कुसुमाग्रज यांचे घस रोषणाईने फुलले आहे. दरम्यान, साहित्य संमेलनात कुठलीही उणीव भासणार नाही. त्यामुळे साहित्यप्रेमींनी साहित्य संमेलनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या