29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रसिंग यांची पुन्हा ८ तास चौकशी

सिंग यांची पुन्हा ८ तास चौकशी

एकमत ऑनलाईन

ठाणे : खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी शुक्रवारी चौकशीसाठी ठाणे नगर पोलिस ठाण्यात हजेरी लावली. पोलिस अधिका-यानी तब्बल ८ तास सिंग यांची कसून चौकशी केली. त्यांचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. चौकशीमध्ये सिंग यांनी सहकार्य केल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिका-याने सांगितले. त्यांना परत चौकशीसाठी उपस्थित राहावे लागणार असून तसे पत्रही त्यांना देण्यात आले आहे. सिंग यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले असल्याचे समजते.

दुसरीकडे ठाणे न्यायालयाने सिंग यांच्याविरुद्ध जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट दोन अटीवर रद्द केले आहे. त्यामुळे त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परमबीर सिंग यांच्यासह आजी-माजी पोलिस अधिकारी आणि इतर अशा एकूण २८ जणांविरुद्ध ३० जुलै रोजी ठाणे नगर पोलिस ठाण्यात खंडणी आणि अन्य विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या विशेष पथकाकडून या गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यात येत असून आतापर्यंत अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

सिंग शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता ठाणे नगर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी उपस्थित राहिले. यावेळी पोलिस ठाण्याच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त होता. चौकशीदरम्यान दुपारी सिंग वकिलांसह ठाणे न्यायालयात गेले. अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याचा अर्ज सिंग यांनी वकीलामार्फत न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयाने देखील १५ हजाराच्या वैयक्तिक बॉंडवर तसेच ज्यावेळी तपास अधिकारी चौकशीसाठी बोलवतील त्यावेळी चौकशीला उपस्थित राहण्याच्या अटीवर न्यायालयाने वॉरंट रद्द केले. त्यानंतर पुन्हा सिंग ठाणेनगर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर सायंकाळी सात वाजता ते पोलिस ठाण्यातून बाहेर पडले.

परमबीर यांच्यावर ५ गुन्हे दाखल
राज्य सीआयडी आणि ठाणे पोलिसांनी परमबीर यांच्याविरोधात लूक आउट परिपत्रक जारी केले आहे. स्ािंग यांच्यावर आतापर्यंत ५ गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी एक मुंबई, एक ठाण्यात आणि तीन प्रकरणांचा तपास राज्य सीएआय करत आहे. परमबीर सिंग यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सरकारच्या गृह विभागाने ७ सदस्यीय एसआयटी टीमची स्थापना केली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या