29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रसिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर

एकमत ऑनलाईन

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला असणा-या कोकणातील निवडणूका राणे घराण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असतात. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूकही आता जाहीर झाल्याने आता उमेदवार आणि या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाकरिता ३० डिसेंबरला निवडणूक तर मतमोजणी ३१ डिसेंबरला होणार आहे.

या निवडणुकीकरीता उमेदवारी अर्ज २९नोव्हेंबरपासून ते ३ डिसेंबरपर्यंत उपविभागीय अधिकारी महसूल यांच्याकडे दाखल करता येणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक सिंधुदुर्गातील राजकारणाच्या दृष्टीने तसेच भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीच्या दृष्टीने प्रतिष्ठेची राजकीय लढाई आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासाठीही ही निवडणूक अतिशय महत्त्वाची असून भाजपाच्या दृष्टीनेही निवडणूक जिंकणे महत्त्वाचे असणार आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या