25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रसिग्नल तोडल्याने रेल्वे अपघात

सिग्नल तोडल्याने रेल्वे अपघात

एकमत ऑनलाईन

मुंबई : माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी रात्री दादरहून निघालेल्या पुद्दुचेरी एक्स्प्रेसला सीएसएमटीहून निघालेल्या गदग एक्स्प्रेसने धडक दिल्याने अपघात झाला. यामध्ये पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे ३ डबे रुळावरून घसरले. हा अपघात सिग्नल तोडल्याने घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मध्य रेल्वेने या अपघाताबाबत एक नोटीसच काढली असून १५ एप्रिलला गाडी क्र. १११३९ चा लोकोपायलट आणि त्यांचा सहकारी समोर रेल्वे ट्रॅकवरील सिग्नल लाल रंगाने दर्शविला असतानाही तो ओळखण्यात असमर्थ ठरले असा त्यातील मजकूर आहे. गदग एक्स्प्रेसच्या लोको पायलट आणि त्याचा सहका-याने सिग्नल लाल असतानाही तो ओलांडला, नीट पाहिला नाही. त्यामुळे हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.

दादर स्थानकातून बाहेर पडताच पुद्दुचेरी एक्स्प्रेसला ‘सीएसएमटी’हून आलेली गदग एक्स्प्रेस धडकली. त्यामुळे पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे मागील एस-१ एस-२ आणि एस-३ हे तीन डबे रुळावरुन घसरले. या धडकेनंतर मोठा आवाज झाला. अपघातात एस-३ डब्याचे मोठे नुकसान झाले. हा डबा एका बाजूला खांबावर कलंडला होता.अपघातानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या अपघाताची संपूर्ण चौकशी केली जाईल, असे सांगितले, तर मध्य रेल्वेच्या अधिका-यांनी सांगितले की, या अपघातात आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

ओव्हरहेड वायर तुटली
या अपघातात पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले. गाड्यांचे डबे आदळल्याने ओव्हरहेड वायर तुटली आणि त्यामुळे थिलंग्या उडून मोठा आवाजही झाला. त्यामुळे प्रवाशांनी जीवाच्या आकांताने रेल्वेबाहेर उड्याही मारल्या होत्या.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या