27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रसीताराम कुंटे यांचा ईडीने नोंदवला जवाब

सीताराम कुंटे यांचा ईडीने नोंदवला जवाब

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची ईडी चौकशी करण्यात आली. आज सकाळी साधारण ११ वाजल्यापासून अनिल देशमुखांशी निगडित असलेल्या खंडणी प्रकरणात चौकशी करण्यात आली. ईडीकडून आतापर्यंत दोन वेळा कुंटे यांना समन्स बजावण्यात आले.
अनिल देशमुख जेव्हा महाराष्ट्राचे गृहमंत्री होते, त्यावेळी ज्या पोलिस अधिका-यांची बदली आणि नियुक्ती झाली, त्याच आधारावर कुंटे यांचा जबाब नोंदवण्यात येत आहे.

ईडीने याआधी गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांचाही जबाब नोंदवला. ईडीने सीबीआयच्या एफआयआरच्या आधारे अनिल देशमुख यांच्यासह अन्य काही लोकांविरोधात गुन्हा नोंदवला. याशिवाय, ही तपास यंत्रणा तत्कालीन राज्य गुप्तचर प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या गोपनीय अहवालाच्या आधारे पोलिस अधिका-यांच्या बदल्या आणि नियुक्तींमध्ये गुंतलेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करत आहे. या अहवालात फोन टॅपिंगदेखील जोडले गेले होते, ज्याने दलाल आणि इतर यांच्यातील संबंध उघड केले होते.

रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांना अहवाल सादर केला. त्यानंतर जयस्वाल यांनी हा अहवाल गृहविभागाचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव कुंटे यांच्याकडे पाठवला, जेणेकरून या अहवालाच्या आधारे काय कारवाई करावी, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करता येईल. या अहवालावर सरकारने कार्यवाही केली नाही, असा आरोप आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या