17.5 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयसुधीर सुरी यांच्या हत्येमागे दहशतवादी लखबीरचा हात

सुधीर सुरी यांच्या हत्येमागे दहशतवादी लखबीरचा हात

एकमत ऑनलाईन

अमृतसर : शिवसेना आमि हिंदूत्व वादी नेते सुधीर सुरी यांच्या हत्येप्रकरणी शनिवारी कॅनडात बसलेला खलिस्तानी दहशतवादी लखबीरची एन्ट्री झाली आहे. फरार दहशतवादी लखबीरने सोशल मीडियावर सुरींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

सुधीर सुरी यांची शुक्रवारी गोळ््या घालून हत्या झाल्याच्या काही वेळातच पोलिसांनी संदीप सिंग ऊर्फ ​​सँडीला अटक करण्यात आली होती. मात्र लखबीरनेच या हत्येची जबाबदारी स्विकारल्याने पंजाबमधील गँगवॉर पुन्हा चर्चेत आले आहे.

या घडामोडीत लखबीरने सुरी यांच्या हत्येची जबाबदारी स्विकारताना केलेल्या ट्विटमध्ये ही फक्त सुरूवात असल्याची धमकीही दिली आहे. त्यामुळे तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे.दुसरीकडे या हत्येनंतर हिंदू संघटनांनी रविवारी ‘पंजाब बंद’ची हाक दिली. तणावपूर्ण वातावरण लक्षात घेता डीजीपी गौरव यादव यांनी तडकाफडकी अमृतसर गाठत सर्व आरोपींना पकडून कटाचा पर्दाफाश केला जाईल, अशी ग्वाही दिली.

सुधीर सुरी यांच्यावर गोळीबार करणारा आरोपी संदीप सिंह हा दुकानदार असून ज्या कारमधून तो आला होता त्यावर कट्टरवादी स्टिकर चिकटवलेले होते. संदिपने पोलिसांसमोरच सुरी यांच्यावर ४ गोळ्या झाडल्या. नंतर तो एका घरात जाऊन लपला होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या