नवी दिल्ली : शिवसेना कुणाची? या प्रश्नाभोवती गेल्या ८ महिन्यांपासून राज्याचं राजकारण ढवळून निघालंय. आज तिस-या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होतं आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा हा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद न्यायालयाने राखून ठेवला आहे. राज्याचं लक्ष लागून राहिलेला निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. जवळजवळ ३ तास युक्तिवाद झाला त्यानंतर ही सुनावणी राखून ठेवण्यात आली आहे. या प्रकरणातील युक्तीवाद पूर्ण झाले आहेत. न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे.
विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतो की नाही, याच मुद्द्यावर हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटापीठाकडे देण्याची उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांनी मागणी केली आहे. पुन्हा पाच न्यायाधीशांचे खंडपीठ रेबिया खटल्यावर पुनर्विचार करु शकते का यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. आज शिंदे गटाने युक्तीवाद केला. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांचा प्रतिवाद केला आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सलग तिस-या दिवशी न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाची मागणीवर ५ न्यायाधीशांच खंडपीठ सुनावणी करणार की हे प्रकरण ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. शिंदे गटासाठी आणि ठाकरे गटामध्ये अटीतटीची बनली आहे. जारी हे प्रकरण ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे गेले तरी या प्रकरणांमध्ये वेळ जास्त लागणार आहे. सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला आहे. ७ जणांच्या खंडपीठाकडं हे प्रकरण जाणार का? हा प्रश्न कायम आहे.