23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयसुप्रीम कोर्टात जोरदार खडाजंगी

सुप्रीम कोर्टात जोरदार खडाजंगी

एकमत ऑनलाईन

ठाकरे सरकारचे भवितव्य थोड्याच वेळात ठरणार
नवी दिल्ली : उद्या होणा-या विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर बुधवारी सायंकाळी ५ पासून सुनावणी सुरू झाली असून, शिवसेनेचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्यासह बंडखोर गटाचे वकील आणि इतर टीमने जोरदार युक्तिवाद केला असून, जवळपास ३ तासांच्या युक्तिवादात दोन्ही बाजूंच्या वकिलांत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी सविस्तररित्या आपली बाजू मांडण्याचे काम केले आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

शिवसेनेचे वकील सिंघवी यांनी ज्या आमदारांनी बंडखोरी केली आहे, ते लोकांच्या इच्छेचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर विश्वास ठेऊ शकत नाहीत का, जर उद्या बहुमत चाचणी घेतली नाही, तर आकाश कोसळणार आहे का, अशी विचारणा केली आहे. दुसरीकडे बंडखोर आमदारांच्या वकिलाने शिंदे गट हीच खरी शिवसेना असून, राज्यपालांचा आदेश बेकायदेशीर नसल्याचे म्हटले आहे. जवळपास ३ तास दोन्ही वकिलांचा युक्तिवाद चालला. आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिल्यानंतर शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुनील प्रभू यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. तर एकनाथ शिंदेंच्या वतीने नीरक कौल यांनी आणि राज्यपालांच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता युक्तिवाद केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या