नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या दिल्लीतील घरात दरोडा पडल्याची माहिती समोर आली आहे. चोरट्यांनी घरातून १.४१ कोटी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी सोनमच्या सासूने तुघलक रोड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा यांच्या दिल्ली येथील येथील घरी चोरी झाली असून, दीड कोटीचा मुद्देमाल चोरांनी लुटला असल्याची माहिती समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर यांची कन्या सोनम कपूर हिचे लग्न आणि सध्या सुरु असलेली प्रेग्नेंन्सी यामुळे ती चर्चेत आहे.