25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयसोनिया गांधींना ईडीकडून पुन्हा समन्स; २६ जुलैला चौकशी

सोनिया गांधींना ईडीकडून पुन्हा समन्स; २६ जुलैला चौकशी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीकडून पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले असून मंगळवार दि. २६ जुलै रोजी त्यांना चौकशी हजर होण्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान कालच त्यांची ईडीकडून तीन तास चौकशी केली होती. सोनिया गांधी गेल्याकाही दिवसांपासून आजारी आहे. त्यामुळे काँग्रेस नेते आक्रमक झाले होते, देशभरात त्यांनी निषेध आंदोलने केली.

नुकत्याच झालेल्या चौकशीदरम्यान सोनिया गांधींनी पुन्हा चौकशीसाठी पाचारण करण्यात येऊ शकते असे बोलले जात होते. त्यानुसार, ईडीने त्यांना पुन्हा चार दिवसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. त्यांना २५ जुलै रोजी बोलवण्यात येणार होते परंतू ही तारीख बदल करण्यात आली असून २६ तारखेला हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. पहिल्यांदा समन्स बजावले तेव्हा सोनिया गांधी यांना कोरोना झालेला असल्यान त्यांनी चौकशीसाठी पुढील तारीख मागून घेतली होती. तर राहुल गांधी हे परदेश दौ-यावर होते. दौ-यावरून परतल्यानंतर ते ईडीसमोर हजर झाले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या