24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयसोशल मीडियाद्वारे कमाई करणा-यांनाही इन्कमटॅक्स

सोशल मीडियाद्वारे कमाई करणा-यांनाही इन्कमटॅक्स

एकमत ऑनलाईन

मुंबई : तुमचा मुलगा किंवा मुलगी प्रौढ नसेल आणि तो यूट्युब, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची प्रतिभा किंवा छंद याद्वारे पैसे कमावत असेल तर पालकांनी त्यांच्या कमाईवर इन्कम टॅक्स रिटर्न भरणे बंधनकारक आहे.

अर्थात तसे न केल्यास आयकर विभाग पालकांना नोटीस बजावू शकतो. आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी विलंबित आयटीआर दाखल करण्याची अद्याप वेळ असल्याने पालक आयटीआर भरू शकतात.
आयकर विभागाने अल्पवयीन मुलाचे उत्पन्न किंवा त्याला भेटवस्तू, मालमत्ता, गुंतवणूक इत्यादी स्वरूपात मिळालेले पैसे कराच्या कक्षेत ठेवले आहेत. आयकर कायद्याच्या कलम ६४ (१अ) अंतर्गत १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे पैसे पालकांच्या आयकर रिटर्नमध्ये एकत्र केले जातील. म्हणजे मुलाच्या संपत्तीवरील आयकर विवरणपत्र वडिलांना भरावे लागेल.

वेगळा आयटीआर
आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, मुलाचे आई आणि वडील दोघेही आयकर रिटर्न भरत असतील तर ज्यांचे जास्त उत्पन्न आहे ते त्याच्या आयटीआरमध्ये मुलाची संपत्ती दाखवतील. जर मूल कोणत्याही प्रकारच्या अपंगत्वाचा बळी असेल, तर आयकर कायद्याच्या कलम ८०यू अंतर्गत त्याची संपत्ती पालकांच्या आयटीआरमध्ये जोडली जाणार नाही. त्यापेक्षा वेगळा आयटीआर दाखल केला जाईल.

अनाथ मुलासाठी वेगळा नियम
आयकर नियमांनुसार, १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या अनाथ मुलाकडे करपात्र संपत्ती असल्यास त्या प्रकरणातही प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केले जाईल. फाइलिंग प्रक्रियेसाठी चार्टर्ड अकाउंटंट किंवा कोणत्याही आयकर फर्मशी संपर्क साधला जाऊ शकतो. आयकर विभागाने अल्पवयीन मुलांसाठी पॅन कार्डची सुविधा आधीच उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अनाथ मुलाला आयटीआर भरण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

उशीरा आयटीआर दाखल करण्याची संधी
२०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी वित्त मंत्रालयाने करदात्यांना आटीआर भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत वेळ दिला होता. मात्र, प्राप्तिकर कायदा १९६१ च्या कलम १३९ (४) अंतर्गत, करदाते अजूनही पुढील ३ महिन्यांत म्हणजे ऑक्टोबर महिन्यापर्यंत विलंब शुल्क भरून आयटीआर दाखल करू शकतात. अल्पवयीन मुलांच्या पालकांना देखील उशीरा आयटीआर दाखल करण्याची संधी आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या