26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रस्पा ते म्युझिकल नाईट, बंडखोरांची मज्जाच मजा

स्पा ते म्युझिकल नाईट, बंडखोरांची मज्जाच मजा

एकमत ऑनलाईन

प्रत्येकाला हेवा वाटेल असे आयुष्य जगताहेत
मुंबई : शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. गेल्या आठवडाभरापासून राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार सध्या गुवाहाटीतील रॅडिसन ब्ल्यू या पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. तिथे रोज त्यांच्या बैठका सुरू आहेत. तेथे त्यांची उत्तम बडदास्त ठेवली जात आहे. विशेष म्हणजे जीम, स्वीमिंग, स्पा, म्युझिकल नाईटसह खाण्यासाठी वेगवेगळ््या डिशची व्यवस्था असून, बंडखोर आमदारांची सध्या चंगळ सुरू आहे. दरम्यान, पंचतारांकित हॉटेलचा हा खर्च नेमका कोण करीत आहे, याची चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल, असे गुवाहाटीचे वर्णन सेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांच्या तोंडून ऐकले आहेच. पाटील आणि इतर आमदारांचे वास्तव्य असलेल्या हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये अनेक उत्तमोत्तम सुविधा आहेत. उठल्या उठल्या हिरवळीवरचा मॉर्निंग वॉक, फिटनेससाठी जीम, खाण्यासाठी वेगवेगळ््या डिश आणि पाहिजे त्या सुविधा हॉटेलमध्ये आहेत. प्रत्येकाला हेवा वाटेल असे आयुष्य सध्या बंडखोर आमदार जगत आहेत.

मॉर्निंग वॉक, जीम, स्वीमिंग, स्पा, स्पेशल ब्रेकफास्ट डिश, सिनेमा, बातम्या पाहण्याची सोय, दुपारचे जेवण, त्याआधी राखीव वेळ, दुपारची झोप, बैठका, हाय टी, मसाज, रात्रीचे जेवण, म्युझिकल नाईट, स्पेशल मसाज अशा एकापेक्षा एक उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

आमदार जेव्हा मतदारसंघात असतात, तेव्हा त्यांना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत विविध कार्यक्रम आणि भेटीगाठी सुरु ठेवाव्या लागतात. लोकप्रतिनिधी कधीही सुटीवर नसतात, त्यांना कायम जनतेसाठी नेहमी उपलब्ध राहावे लागते. पण या आमदारांसाठी सध्या सुटीची वेळ आहे. कारण पक्षाविरोधात बंड केल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया होईपर्यंतचा वेळ या आमदारांकडे आहे.

शिंदेंना अजूनही आमदार फुटण्याची भीती
आमदारांना हॉटेलमधून बाहेर पडण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. आमदार फुटण्याची किंवा आमदार मुंबईकडे वळण्याची भीती शिंदे यांना आहे. त्यामुळेच हॉटेलमध्ये राहूनच आमदाराचे जास्तीत जास्त मनोरंजन कसे केले जाईल, याची काळजी घेतली जात आहे. सत्ता स्थापन होण्यासाठी किती वेळ लागेल ते माहीत नाही. पण आमदारांची मात्र आसाममध्ये सध्या चांगलीच मौज सुरू आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या