नवी दिल्ली : कोचीन शिपयार्ड लिमिटेडने गुरुवारी स्वदेशी बनावटीची विमानवाहू नौका विक्रांत नौदलाकडे सुपूर्द केली आहे. विक्रांतची रचना नौदलाच्या इंटिरिअर डायरेक्टरेट ऑफ नेव्हल डिझाईनने केली आहे. ही देशातील पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलाला सोपवण्यात आली आहे.
१९७१ च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणा-या भारतीय नौदल जहाज विक्रांतच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे. ऑगस्टमध्ये अधिकृतपणे नौदलात सामील होऊ शकते. आयएएसच्या समावेशामुळे हिंद महासागर क्षेत्रात देशाची स्थिती आणखी मजबूत होईल. सीएसएलने एका प्रसिद्धिपत्रकात विमानवाहू जहाज सुपूर्द केल्याची पुष्टी केली आहे. ही भारतातील आतापर्यंतची सर्वांत मोठी युद्धनौका आहे.
या युद्धनौकेचे वजन सुमारे ४५,००० टन आहे. याला देशातील सर्वांत महत्त्वाकांक्षी नौदल जहाज प्रकल्पदेखील मानले जाते. भारताची पहिली विमानवाहू युद्धनौकेने १९७१ च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारी होती. त्याच्या नावावर आयएसीचे नाव ठेवण्यात आले आहे. विक्रांतच्या पुनर्जन्माच्या निमित्ताने ‘आझादी का अमृत महोत्सव’ हा सागरी सुरक्षा बळकट करण्याच्या दिशेने क्षमता निर्माण करण्याच्या देशाच्या उत्साहाचा खरा पुरावा आहे.