23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeराष्ट्रीयस्वातंत्र्य लढ्यात मुस्लिमांचाही वाटा

स्वातंत्र्य लढ्यात मुस्लिमांचाही वाटा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : असदुद्दीन ओवैसी यांचे एक भाषण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यात स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत आहेत. भारत पाकिस्तान फाळणीला भारतातली मुस्लिम जबाबदार नाहीत. ज्यांचे पाकिस्तानवर प्रेम ते तेव्हाच तिकडे गेले. जे मुस्लिम भारतात आहेत त्यांचे देशावर विशेष प्रेम आहे. त्यावर कुणी शंका घेऊ नये.

देशाच्या फाळणीला मुस्लिम जबाबदार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, स्वातंत्र्य लढ्यात आमचाही वाटा आहे. मुस्लिमही देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेत. त्यांचे ते बलिदान आठवा’’, असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले आहेत. काल रात्री एमआयएमच्या वतीने भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत मुस्लिमांच्या महान योगदानाचा गौरव करण्यासाठी जाहीर सभा घेण्यात आली होती. तेव्हा ओवैसी बोलत होते.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसेने केली. आता सांगा भारतावर खरे प्रेम कुणाचे आहे?, असा सवाल या वेळी ओवैसींनी विचारला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या