26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeराष्ट्रीयस्वित्झर्लंडचा कॅमेरॉनवर १-० ने विजय, तर उरुग्वे-दक्षिण कोरिया सामना अनिर्णीत

स्वित्झर्लंडचा कॅमेरॉनवर १-० ने विजय, तर उरुग्वे-दक्षिण कोरिया सामना अनिर्णीत

एकमत ऑनलाईन

दोहा : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी सकाळपासून दोन सामने झाले. यातील पहिल्या सामन्यात स्वित्झर्लंडने कॅमेरॉनवर १-० ने विजय मिळवला, तर उरुग्वे-दक्षिण कोरिया सामन्यात एकही गोल न झाल्याने सामना अनिर्णित राहिला.

पहिल्या सामन्याचा फीफा रँकिंगमध्ये १४ व्या स्थानावर असणा-या स्वित्झर्लंडने आपल्या रँंिकगला साजेशा खेळ कर ३८ व्या स्थानावरील कॅमरॉनवर १-० ने विजय मिळवला. अर्थात कॅमेरॉन संघानेही कडवी झुंज दिली. सामन्यातील एकमेव गोल हा एम्बोलो याने केला. सामन्यात सुरुवातीपासून दोन्ही संघ अटीतटीचा खेळ दाखवत होते. ४५ मिनिटे अर्थात निम्मा सामना झाला तरी दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही. पण हाल्फ टाईमनंतर दुस-याच मिनिटाला संघाचा स्टार खेळाडू शकिरीने उत्कृष्ट क्रॉस दिला, ज्यावर एम्बोलोनेही चूकी न करता दमदार गोल केला. त्यानंतर मात्र दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही. पण १-० च्या आघाडीने स्वित्झर्लंडने सामना खिशात घातला.

उरुग्वेशी दक्षिण कोरियाशी कडवी झुंज
दुस-या सामन्यात दोनदा विश्वचषक विजेत्या उरुग्वे संघाला एकही गोल करता आला नाही. दक्षिण कोरियाने दमदार डिफेन्ससोबत आक्रमणे सुरु ठेवली आणि एका अटीतटीच्या सामन्यात अखेर दोन्ही संघाना एकही गोल करता न आल्याने ०-० स्कोरमुळे सामना बरोबरीत सुटला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या