22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयस्विस बँकेत अनिल अंबानींचा पैसा

स्विस बँकेत अनिल अंबानींचा पैसा

एकमत ऑनलाईन

 ४२० कोटींच्या करचोरी प्रकरणी आयकर विभागाची नोटीस

मुंबई : रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्यामागील शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. आर्थिक दिवाळखोरीची टांगती तलवार असलेल्या अनिल अंबानी यांच्याविरोधात आता काळा पैसा कायद्यांतर्गत कारवाईची टांगती तलवार आहे.

आयकर विभागाने अनिल अंबानी यांच्याविरोधात खटला चालवण्याची परवानगी मागितली आहे. आयकर विभागाने स्विस बँकेतील अनिल अंबानी यांच्या खात्यातील ८१४ कोटी हून अधिक अघोषित संपत्तीवर ४२० कोटींच्या करचोरी प्रकरणात आयकर खात्याने ही परवानगी मागितली आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, अनिल अंबानी यांनी जाणीवपूर्वक करचोरी केली असल्याचा आरोप आयकर विभागाने केला आहे. अनिल अंबानी यांनी परदेशी बँकेत असलेल्या खात्यातील रकमेची माहिती भारतीय आयकर अथवा संबंधित विभागांना दिली नाही. याच प्रकरणी अनिल अंबानी यांना ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

अनिल अंबानी यांच्याविरोधात ब्लॅक मनी इम्पोजिशन ऑफ टॅक्स अ‍ॅक्ट २०१५ तील कलम ५० आणि ५१ नुसार खटला चालवण्यात येऊ शकतो. या कलमानुसार दंडासह १० वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
आयकर विभागाने अनिल अंबानी यांना बजावलेल्या नोटिसीत ३१ ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. अनिल अंबानी यांच्याविरोधात आर्थिक वर्ष २०१२-१३ पासून ते २०१९-२० पर्यंतच्या कालावधीत परदेशात अघोषित संपत्तीवरील करचोरी केल्याचा आरोप आहे.

आयकर विभागाच्या नोटिसीनुसार, अंबानी हे बहामास येथील डायमंड ट्रस्ट आणि नॉर्दर्न अटलांटिक ट्रेडिंग अनलिमिटेड कंपनीचे इकॉनॉमिक कंट्रीब्युटर आणि बेनेफिशियल ऑनर आहेत. नॉर्दर्न अटलांटिक ट्रेडिंग अनलिमिटेड कंपनीची नोंदणी करण्यात आली. हे ठिकाण करचोरी करणा-यांसाठी स्वर्ग मानले जाते.

आयकर खात्याला कोणती माहिती मिळाली?
बहामास येथील डायमंड ट्रस्ट ही ड्रीमवर्क होल्ंिडग्स इंक नावाची कंपनी चालवते. या कंपनीने स्विस बँकेत खाते उघडले आहे. या खात्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी ३२,०९५,६०० डॉलर जमा झाले. नोटीसनुसार, ट्रस्टला २५,०४०,४२२ डॉलरचा प्रारंभिक निधी मिळाला होता. हा निधी अनिल अंबानी यांच्या वैयक्तिक खात्यातून पाठवण्यात आल्याचे आयकर विभागाचे म्हणणे आहे. अंबानी यांनी २००६ मध्ये ट्रस्ट उघडण्यासाठी केवायसी दरम्यान त्यांचा पासपोर्ट दिला होता. या ट्रस्टच्या लाभार्थ्यांमध्ये त्यांच्या कुटुंबीयांचाही समावेश असल्याचे आयकर खात्यांनी म्हटले.

अंबानी यांना द्यावा लागणार कोट्यवधींचा कर
जुलै २०१० मध्ये नोंदणीकृत झालेल्या कंपनीने झुरिच येथील बँक ऑफ सायप्रसमध्ये खाते उघडले. अनिल अंबानी हे या कंपनीचे आणि कंपनीच्या निधीचे अंतिम लाभार्थी मालक असल्याचा आरोप आयकर विभागाने केला आहे. या कंपनीला २०१२ मध्ये बहामामध्ये नोंदणीकृत असलेल्या कंपनीकडून १०कोटी डॉलरचे कर्ज मिळाले होते. अनिल अंबानी हे त्याचे लाभार्थी होते. कर अधिका-­यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही स्विस बँक खात्यांमध्ये एकूण ८१४ कोटी रुपये जमा असून त्यावर ४२० कोटी रुपयांचा कर लागू होतो.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या