24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयहताश पुतीन अणवस्त्र वापरणार?

हताश पुतीन अणवस्त्र वापरणार?

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : यूक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध ५१ दिवसांपासून सुरु आहे. युद्ध लांबल्याने हताश झालेले रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यूक्रेनवर अणवस्त्राचा हल्ला करू शकतात, असा इशारा अमेरिकेच्या सीआयएने दिला आहे. सीआयएचे संचालक विल्यम बर्न्स यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचे संचालक विल्यम बर्न्स यांनी यूक्रेन विरोधातील युद्धात रशिया अणवस्त्राचा वापर करू शकते असा इशारा दिला आहे. रशिया अणवस्त्राचा वापर करण्याची शक्यता असून, त्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे बर्न्स यांनी म्हटले आहे. सीआयएच्या संचालकांच्या इशा-यामुळे रशिया यूक्रेन युद्धात अणवस्त्राचा वापर होण्याची शक्यता वाढली आहे. मात्र, रशिया अणवस्त्राचा वापर करेल यासंदर्भातील अधिक माहिती मिळाली नसल्याचेदेखील त्यांनी म्हटले आहे.

रशियाने २४ फेब्रुवारीला यूक्रेनवर आक्रमण सुरु केले. दुस-या महायुद्धानंतर यूरोपधील सर्वात मोठे युद्ध म्हणून याकडे पाहिले जात आहे. रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचे निकटवर्तीय दमित्री मेदवेदवे यांनी स्वीडन आणि फिनलँड यांनी नाटोमध्ये प्रवेश केल्यास रशिया त्यांच्या कालिनग्राड येथे अणवस्त्र आणि हायपरसोनिक मिसाईल तैनात करणार असल्याचा इशारा दिला होता. दुसरीकडे फिनलँडच्या नाटोमध्ये जाण्यासंदर्भातील हालचाली सुरु झाल्या आहेत. फिनलँडची जनता नाटोतील सहभागाच्या बाजूने आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या