26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeक्रीडाहरमनप्रीत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट

हरमनप्रीत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट

एकमत ऑनलाईन

सिडनी : भारताच्या महिला टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने महिला बिग बॅश लीगच्या सातव्या सत्रात आपल्या दमदार कामगिरीच्या बळावर इतिहास घडवला आहे. महिला बिग बॅश लीगमध्ये प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार जिंकणारी हरमनप्रीत पहिली भारतीय ठरली आहे.

हरमनप्रीतने चालू हंगामात मेलबर्न रेनेगेडससाठी चमकदार कामगिरी केली आहे. अष्टपैलू हरमनप्रीतने या स्पर्धेत खेळल्या गेलेल्या ११ सामन्यांमध्ये १३५.२५ च्या सरासरीने ३९९ धावा केल्या, तर गोलंदाजीत २०.४ च्या सरासरीने १५ विकेट्सही घेतल्या. तिने आपल्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडताना १८ षटकारही ठोकले आहेत. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर बिग बॅशमध्ये पुनरागमन करणा-या हरमनप्रीतने सोफी डिव्हाईनला सलग तिस-यांदा स्पर्धेतील सर्वात यशस्वी खेळाडू होण्यापासून रोखले.

प्लेअर ऑफ द टूर्नामेंटसाठी झालेल्या मतदानात हरमनप्रीत कौरला सर्वाधिक ३१ मते मिळाली. तिच्यापाठोपाठ बेथ मुनी आणि सोफी डेव्हाईन ज्या पर्थ स्कॉचर्सकडून खेळल्या, त्या प्रत्येकी २८ मतांसह दुस-या स्थानावर राहिल्या. ब्रिस्बेन हीटकडून खेळणा-या ग्रेस हॅरिसला २५ आणि जॉर्जिया रेडमायनला २४ मते मिळाली. गेल्या दोन मोसमात सोफी डिव्हाईनला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून गौरविण्यात आले. यावेळी हा पुरस्कार ३ मतांच्या फरकाने हुकला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या