25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रहल्ले करणा-यांच्या विचारांची कीव येते ; हल्ल्यानंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया

हल्ले करणा-यांच्या विचारांची कीव येते ; हल्ल्यानंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया

एकमत ऑनलाईन

मुंबई: आपल्या सगळ्यांच्या आशिर्वादाने मी सुखरुप आहे मला कोणतीही ईजा झाली नाही. सुभाष देसाईंचा आणि हल्ले करणा-यांच्या अकलेची मला कीव करावीशी वाटते. लोकशाहीमध्ये एखादा विचार बदलणं चांगल्या गोष्टींसाठी उठाव करणं याचा परिणाम अशा हल्ल्यात होत असेल तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.

घडलेल्या प्रकारावर मी फार बोलत नाही याचा अर्थ मी हतबल आहे असा नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या कारवर काल (२ ऑगस्ट) कात्रज परिसरात हल्ला करण्यात आला. त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली . शिवसैनिकांनी हा हल्ला केल्याचं शिंदे गटाचं मत आहे. मात्र या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण हिंसक झाल्याचे चित्र आहे.

राजकारणाची लढाई ही विचारांची असते. त्यामुळे विकासाबाबत विचार करावा, कालचा जो हल्ला झाला तो ज्यांनी केला त्यांची मला कीव येते. टीकेचे उत्तर विकासकामे करुन द्या, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. मी बोलत नाही. उत्तर देत नाही प्रतिक्रिया देत नाही याचा अर्थ माझ्यावर चांगले संस्कार आहेत. मी काहीच करु शकत नाही असा जर कोणाचा गोड गैरसमज असेल तर चुकीचे आहे. मी सामान्य कार्यकर्ता असतो आणि माझ्या नेत्यांनी असं केले असते तर मी स्वत: त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले असते, असेही ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या