29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeराष्ट्रीयहवामानाच्या अनपेक्षीत बदलामुळेच अपघात

हवामानाच्या अनपेक्षीत बदलामुळेच अपघात

- सीडीएस रावत हेलिकॉप्टर अपघात - तपास समितीचा प्राथमिक अहवाल समोर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा आठ डिसेंबर रोजी हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अपघातात एकूण चौदा जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातासंदर्भात संपूर्ण देशाला प्रश्न पडले होते की हा अपघात नेमका झाला कसा? आणि कशामुळे झाला. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीचा प्राथमिक अहवाल समोर आला असून, हवामानाच्या अनपेक्षीत बदलांमुळेच सदर अपघात झाल्याचे समोर आले आहे.

या अपघाताच्या तपासाअंती त्यांनी सांगितले की, या संपूर्ण घटनेच्या पाठीमागे कसल्याही प्रकारचा कट होता किंवा कुठला तांत्रिक बिघाड हेलिकॉप्टर होता वा कुठल्याही प्रकारचे दुर्लक्ष झाले होते, अशी कोणतीच बाब समोर आलेली नाही. तमिळनाडू राज्यातील खो-यातील हवामानात अनपेक्षित बदल झाल्याने हेलिकॉप्टर ढगांमध्ये घुसल्याने हा अपघात झाल्याचे चौकशी पथकाने सांगितले आहे. अचानकपणे क्लायमेट बदलले आणि हेलिकॉप्टरचा मार्ग बदलला आणि ते पायलटच्या नियंत्रणात न राहता ढगामध्ये गेल्याने त्याचा मार्ग भटकल्याचा अहवाल समोर आला आहे. या समितीने सगळ्या बाबींची मदत घेऊन, घटनेशी निगडीत लोकांची साक्षही नोंदवली आहे. त्यातूनच हा अहवाल त्यांनी मांडला आहे. हेलिकॉप्टरमध्ये कुठल्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड किंवा कटकारस्थान नसल्याची माहिती समोर आली आहे.

त्रि-सेवा तपास पथकाचा निष्कर्ष
हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखालील त्रि-सेवा तपास पथकाचा हा अधिकृत निष्कर्ष आहे. ५ जानेवारी रोजी त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना चौकशीतील निष्कर्षांची माहिती दिली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या