27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeक्रीडाहिंदू-मुस्लिमपेक्षा माझ्यासाठी देश महत्त्वाचा

हिंदू-मुस्लिमपेक्षा माझ्यासाठी देश महत्त्वाचा

एकमत ऑनलाईन

सुवर्णपदक विजेती निखत झरीनने दिले टीकाकारांना उत्तर
मुंबई : निखत झरीनने भारताला विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून दिले होते. या सुवर्णपदकाची चर्चा झाली, पण त्यापेक्षा चर्चा अन्य गोष्टींची झाली. याबाबत बोलणा-या समाजकंटकांना झरीनने एक चांगलाच ठोसा दिला. हिंदू-मुस्लिमपेक्षा माझ्यासाठी देश महत्वाचा आहे, असे वक्तव्य आता झरीनने करत खेळा व्यतिरिक्त आलेल्या अन्य गोष्टींना पूर्णविराम दिला.

झरीनला एका मुलाखतीत विचारण्यात आले की, लोक तिची मेहनत आणि रिंगमधील कामगिरीपेक्षा तिच्या धार्मिक पार्श्वभूमीबद्दल अधिक बोलतात, तेव्हा तिने सांगितले की, हिंदू-मुस्लिम आणि अन्य कोणत्याही गोष्टींचा मला काही फरक पडत नाही. एक खेळाडू म्हणून मी भारताचे प्रतिनिधित्व करते. मला हिंदू-मुस्लिम या वादात पडायचे नाही आणि मला त्या गोष्टींचा काही फरक पडत नाही. मी कोणत्याही समुदायाचे प्रतिनिधित्व करत नाही, मी देशाचे प्रतिनिधित्व करते आणि देशासाठी पदक जिंकून मला आनंद होतो.

भारतीय खेळाडू नियमित स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करतात. परंतु ऑलिम्पिक किंवा जागतिक स्पर्धांसारख्या मोठ्या मंचावर ते कमी पडतात. याबाबत जेव्हा निखतला विचारण्यात आले की, भारतीय बॉक्सर्सची कमतरता कुठे आहे, तेव्हा ती म्हणाली की, भारतीय बॉक्सर्स खूप प्रतिभावान आहेत, आम्ही कोणापेक्षा कमी नाही. आमच्याकडे ताकद, वेग आणि आवश्यक कौशल्ये सर्व काही आहे.

तुम्ही एकदा जागतिक स्तरावर पोहोचलात की खेळाडूंना मानसिक दबाव हाताळण्यासाठी प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. मोठ्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर अनेक खेळाडू दडपणाखाली येतात आणि त्यांना चांगली कामगिरी करता येत नाही, तर काही खेळाडू मोठ्या टप्प्यावर पोहोचल्यार चांगली कामगिरी करतात. या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे हे दडपण कसे हाताळले जाते, हे सर्वांत महत्वाचे ठरते, असेही ती म्हणाली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या