27.3 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeराष्ट्रीयऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड सुप्रीम कोर्टात

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड सुप्रीम कोर्टात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थात हिजाब बंदी योग्य असल्याचा निर्णय दिला होता. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घालण्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याचिका फेटाळल्या.

कर्नाटकात शाळा आणि महाविद्यालयात हिजाबवरून वाद निर्माण झाल्यानतंर या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. शाळा, महाविद्यालयात हिजाब बंदीविरोधात अनेक याचिका दाखल केल्या होत्या. या प्रकरÞणी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रितू राज अवस्थी, न्यायाधीश कृष्णा दीक्षित आणि न्यायाधीश जेएम खाजी यांच्या खंडपीठाने निर्णय दिला. सध्या राज्य सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव उडुपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यातील शाळा, कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला होता निकाल
त्यानंतर शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला होता. हिजाबवरून झालेल्या वादानंतर याबद्दल याचिका दाखल करण्यात आली होती. एका महाविद्यालयात हिजाब घालून आलेल्या विद्यार्थीनींना प्रवेश नाकारल्यानंतर वाद निर्माण झाला होता. हिजाब हा मुस्लिम धर्मात अनिवार्य नसल्याचेही न्यायालयाने म्हटले होते.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या