18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयहिजाब- भगवा वादावरून हाणामारी

हिजाब- भगवा वादावरून हाणामारी

एकमत ऑनलाईन

कोलकाता : पश्चिम बंगालच्या हावडा येथील एका शाळेत मंगळवारी विद्यार्थ्यांच्या दोन गटांत तुफान राडा झाला. हिजाबला आव्हान देण्यासाठी एका गटाने भगवा स्कार्फ घालून वर्गात जाऊ देण्याची परवानगी मागीतल्याने ही तुंबळ हाणामारी झाली.

जर मुलींना हिजाब घालून वर्गात प्रवेश मिळू शकतो, तर आम्हाला भगवा स्कार्फ घालून का नाही? असा सवाल त्यांनी केला. तणाव निवळण्यासाठी पोलीस आणि शीघ्र कृती दलाच्या जवानांना तैनात करावे लागले. त्यामुळे बोर्डाच्या पूर्व परीक्षा रद्द कराव्या लागल्या. पश्चिम बंगाल बोर्डाशी सलग्न धुलागोरी आदर्श विद्यालयाने यावर तातडीने संचालकांची बैठक बोलावली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या