27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्र१०८८ कर्मचारी निलंबित

१०८८ कर्मचारी निलंबित

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्य सरकारने एसटी कर्मचा-यांच्या संपानंतर पगारवाढीचा निर्णय घेतला. तसेच कर्मचा-यांना पुन्हा कामावर हजर होण्याचे आदेश दिले. मात्र, त्यानंतरही काही कर्मचारी संघटनांनी एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाच्या मुद्यावर संप सुरूच ठेवला. कर्मचारी अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे आज एसटी महामंडळाने आणखी १०८८ एसटी कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई केली.

तसेच २५४ जणांची सेवा समाप्त करण्यात आली.
राज्य सरकारने आज (२९ नोव्हेंबर) कामावर हजर राहण्याचे आदेश देऊनही संप करणा-या १०८८ कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई केली. याशिवाय २५४ जणांची थेट सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासह आतापर्यंत सेवा समाप्त झालेल्या कर्मचा-यांची संख्या १ हजार ७७९ वर पोहोचली आहे. दरम्यान, परभणी विभागातील एसटी महामंडळाचे २०५ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.

परभणी विभागातील एसटी कर्मचा-यांचे आंदोलन सुरू असल्याने परभणी विभागातून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे आज परभणी विभागातील २०५ कर्मचा-यांवर कारवाई करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातही कर्मचा-यांनी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याचे सांगत संप मागे घेतला होता. मात्र, त्यानंतर कर्मचा-यांमध्ये उभी फूट पडल्याचे दिसत असून, जिल्ह्यातील मध्यवर्ती बसस्थानक वगळता इतर ठिकाणचे कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एसटी सेवा ठप्प आहे.

१९ हजार १६३ एसटी कर्मचारी कामावर परतले
एसटी महामंडळाच्या संपात सहभागी कर्मचारी हळूहळू कामावर परतू लागले. आज १९ हजार १६३ कर्मचारी कामावर पुन्हा हजर झाले आहेत. यामध्ये प्रशासकीय विभागातील ८ हजार ९२२, कार्यशाळेत काम करणारे ५ हजार ४४२, चालक २ हजार ५४९ तर वाहक २ हजार २५० पुन्हा एकदा कामावर परतले आहेत, असे महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या