कोलकाता : द पुष्पा राइस या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. या चित्रपटातील गाणे आणि डायलॉगने तरूणाईला वेड लावले. अशात बहुतांश लोक या चित्रपटातील गाण्यावर आणि डायलॉगवर व्हीडीओ बनवत सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. मात्र यातच एका दहावीच्या विद्यार्थ्याने तर कहरच केला. या विद्यार्थ्याने १० वीच्या परीक्षेमध्ये उत्तरपत्रिकेच्या संपूर्ण पानांवर पुष्पा राज अपुन लिखेगा नही साला असे लिहले. सध्या या उत्तरपत्रिकेच्या पानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
परीक्षा म्हटले की कॉपीची काही प्रकरणं समोर येतात. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका सर्वांना शॉक करणार. पुष्पा चित्रुपटातील अल्लु अर्जुनचा पुष्पा…पुष्पराज मैं झुकेगा नहीं हा डायलॉग चांगलाच फेमस झाला. सोशल मीडियावर याचे अनुकरण करीत रिल्स येऊ लागले. पण आता हा डायलॉग रिल्सपुरता मर्यादित राहिला नसून रिऍलिटीतही दिसून आला. या दहावीच्या विद्यार्थ्याने चक्क आपल्या उत्तरपत्रिकेत पुष्पा राज अपुन लिखेगा नही साला हा डायलॉग आपल्या मर्म भावनेत लिहिला.
ही उत्तरपत्रिका दहावीच्या परिक्षेची असून पश्चिम बंगालमधील असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. साउथचा सुपरस्टार असलेला अल्लू अर्जुनचा हा चित्रपट फक्त दक्षिण भारतात मर्यादित राहिला नाही तर संपूर्ण देशभर या चित्रपटाचे वेड लागले होते. कारण या चित्रपटाला अनेक भाषांमध्ये दाखविण्यात आले. त्यामुळे सर्वत्र या चित्रपटाचे चाहते दिसून येत आहे.