27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeराष्ट्रीय१५ जानेवारीनंतरही रॅली, सभांवर बंदी कायम?

१५ जानेवारीनंतरही रॅली, सभांवर बंदी कायम?

एकमत ऑनलाईन

लखनौ : कोरोना महामारी आणि ओमिक्रॉन संकटामध्ये उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. मात्र १५ जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, साईकल आणि बाईक रॅलीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. परंतु सध्या देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता आयोग यावर १५ जानेवारीनंतर देखील ही बंदी कायम ठेवण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळपर्यंत या विषयी निर्णय येण्याची शक्यता आहे.
कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर होणा-या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्बंध लागू केले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी एक तासाने वाढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच प्रचारादरम्यान कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. १५ जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, साईकल आणि बाईक रॅलीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. त्यानंतर कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असे देखील म्हटले होते. त्यामुळे सध्या देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता आयोगाकडून या संदर्भात निर्णय येण्याची शक्यता आहे.

व्हर्च्युअल माध्यमातून प्रचारास परवानगी
तसेच निवडणूक आयोगाने सर्व पक्ष आणि उमेदवारांना डोअर टू डोअर प्रचारासाठी परवानगी दिली आहे. तसेच व्हर्च्युअल माध्यमातून उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. काही पक्षांनी तर याची सुरुवात देखील केली आहे. परंतु उत्तरप्रदेशसारख्या राज्यात विना रॅली निवडणुकांचा प्रचार कसा होणार यासाठी काही पक्ष चिंतेत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या