26.9 C
Latur
Sunday, May 29, 2022
Homeराष्ट्रीय२३ जानेवारीपासून तामिळनाडूत संपूर्ण लॉकडाऊन

२३ जानेवारीपासून तामिळनाडूत संपूर्ण लॉकडाऊन

एकमत ऑनलाईन

चेन्नई : देशातील कोरोना संसर्ग वाढीचा वेग आता चांगलाच वाढला असून दुस-या लाटेचा विक्रमही मोडित निघाला आहे. ओमिक्रॉनमुळे हा संसर्ग वाढत असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाच्या अधिका-यांनीच स्पष्ट केले आहे. देशात तिसरी लाट आली असून, केंद्र सरकारसह राज्ये निर्बंध घालू लागली आहेत. संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करणारे तमिळनाडू हे पहिले राज्य ठरले आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी येत्या २३ जानेवारीपासून संपूर्ण राज्यात संपूर्ण लॉकडाऊन असल्याची घोषणा केली आहे. तामिळनाडूमध्ये आज २८,५६१ कोविड-१९ प्रकरणांची नोंद झाली आहे. तर चेन्नईमध्ये ७,५२० प्रकरणे नोंदली गेली आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. तामिळनाडू सरकारने याआधीच रात्रीची संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने दर रविवारी संपूर्ण लॉकडाऊन आहेच. नागरिकांनी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी धार्मिक स्थळी जाता येणार नव्हते. याचबरोबर रेस्टॉरन्ट, मॉल आणि दुकानेही हे बंद होती तर दर रविवारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि मेट्रो सेवा बंद होती.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या