22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeमहाराष्ट्र२५ डिसेंबर रोजी भाजपा राबविणार अटलशक्ती महासंपर्क अभियान

२५ डिसेंबर रोजी भाजपा राबविणार अटलशक्ती महासंपर्क अभियान

एकमत ऑनलाईन

पुणे : लोकोपयोगी कामे होत असताना सत्ता आणि संघटन एकत्रित काम करीत आहेत, त्यामुळे शहरात जिथे जाईल तिथे भाजपचेच अस्तित्व जाणवते, असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी (२५ डिसेंबर) शहर भाजपच्या वतीने अटलशक्ती महासंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या प्रचारार्थ तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन, बोधचिन्ह आणि पक्षाच्या यूट्यूब चॅनेलचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नारायण राणे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी आमदार योगेश टिळेकर यांची उपस्थिती होती.

मॅन टू मॅन आणि हार्ट टू हार्ट म्हणजेच मतदारांशी थेट संपर्क हे भाजपचे पारंपरिक शक्तीस्थळ आहे. मतदारांपर्यंत केंद्र आणि महापालिकेच्या माध्यमातून केलेली विकासकामे आणि योजना पोहोचवा. त्यासाठी अटलशक्ती महासंपर्क अभियान महत्त्वाचे आहे असे राणे म्हणाले, पुणेकरांना नागरी सुविधा देऊन, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करा. भाजपचे पुण्यात वर्चस्व आहे. लोकसंपर्क, लोकांचा विश्वास, जागरूकता, नियोजन, जिद्द, निष्ठा आणि प्रामाणिकपणाची जोड यामुळे निवडणुकीत विजय खेचून आणण्याचे कौशल्य प्राप्त करता येते.

राजकारणात केवळ आत्मविश्वास कामाचा नाही, तर सैन्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी निवडणुकीत विजय मिळेपर्यंत जागरूक राहायला पाहिजे. चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपचे ३३ हजारहून अधिक कार्यकर्ते २५ डिसेंबरला एकाच दिवसात पुणे शहरातील दीड लाखाहून अधिक घरांत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे कार्य घराघरांत पोहोचविण्यासाठी अटलशक्ती महासंपर्क अभियान राबविणार आहेत. केंद्र सरकारच्या लोकोपयोगी योजना, महापालिकेची विकासकामे घरोघरी पोहोचविली जाणार आहेत. या माध्यमातून संघटनेचे सक्षमीकरण आणि जनसंपर्क वाढविण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या