मराठवाड्यात ३३ लाख ८४ हजार ९५९ लाभार्थी
औरंगाबाद : मराठवाड्यात पीक नुकसानीच्या अनुदान वाटपाची प्रक्रिया दोन आठवड्यांपासून सुरू असून, आठ नोव्हेंबरपर्यंत ३३ लाख ८४ हजार ९५९ नुकसानग्रस्त शेतकºयांना दोन हजार १६१ कोटी २९ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. अद्यापही विभागातील १३ लाख ८९ हजार शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. यात केवळ नांदेडमध्ये पोटनिवडणुकीमुळे वाटपाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.
औरंगाबादसह मराठवाड्यात यंदाही अतिवृष्टीने कहर केला. अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे तब्बल ३६ लाख ५२ हजार हेक्टरातील खरीप पिकांना जबर फटका बसला. त्यासोबतच फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचा फटका विभागातील ४७ लाख ७४ हजाराहून अधिक शेतकºयांना बसला आहे. दरम्यान, सरकारने जिरायतीसाठी हेक्टरी १० हजार, बागायतीसाठी १५ तर फळबागासाठी हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत जाहीर केली. वाढीव निधीसह घोषित केलेल्या निधीपैकी सध्या ७५ टक्के असा एकूण राज्यासाठी २ हजार ८६० कोटी ८४ लाख ७ हजार रुपयांचा निधी देण्यात आला असून, त्यापैकी मराठवाड्याच्या वाट्याला २ हजार ८२१ रुपये मिळाले आहेत. त्याचे वाटप गेल्या दोन आठवड्यापासून सुरू आहे.
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकºयांना केली जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, मराठवाड्यातील ३३ लाख ८४ हजार ९५९ शेतकºयांना आठ नोव्हेंबरपर्यंत २ हजार १६१ कोटी २९ लाख ९ हजार रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे, तर उर्वरित १३ लाख ८९ हजारांपेक्षा जास्त शेतकरी मात्र अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे.
शेतीच्या नुकसानीचे वाटप
जिल्हा प्राप्त अनुदान वितरणाची टक्केवारी
औरंगाबाद : ४१६ कोटी ५४ लाख ८१.२२
जालना : ४२५ कोटी ७ लाख ९०.१९
परभणी : २५५ कोटी १९ लाख ७७.५७
ंहिंगोली : २२२ कोटी ९४ लाख ९१.६६
नांदेड : ४२५ कोटी ३६ लाख १०.३७
बीड : ५०२ कोटी ३७ लाख ९३.०६
लातूर : ३३६ कोटी ५६ लाख ९३.०६
उस्मानाबाद : २३७ कोटी ६१ लाख ८९.४१