28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeराष्ट्रीय२ हजार वर्षांपूर्वीचा खजिना सापडला

२ हजार वर्षांपूर्वीचा खजिना सापडला

एकमत ऑनलाईन

मुंबई : पुरातत्वशास्त्रज्ञांनी पाण्यात दोन डझनहून अधिक चांगल्या प्रकारे संरक्षित असलेल्या कांस्य धातूच्या ग्रीक-रोमन देवतांच्या मूर्ती शोधून काढल्या आहेत. या मूर्ती २ हजार वर्षांहून अधिक जुन्या असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्खननात सापडलेल्या या मूर्त्या तज्ज्ञांसाठी जॅकपॉटपेक्षा कमी नाहीत.

ही शिल्पे इटलीच्या सिएना प्रांतातील टस्कनी परिसरातून सापडली आहेत. हे शहर रोमच्या उत्तरेस १६० किमी अंतरावर आहे. पुरातत्वशास्त्रज्ञ २०१९ पासून या भागातील एका प्राचीन स्नानगृहाच्या अवशेषांचा शोध घेत आहेत. सिएना येथील युनिव्हर्सिटी फॉर फॉरेनर्सचे सहाय्यक प्राध्यापक जेकोपो तबोली हे या उत्खननाचे कोऑर्डिनेटर आहेत. ते म्हणाले की, हा अतिशय महत्त्वाचा आणि विलक्षण शोध आहे.

संस्कृती मंत्रालयाचे उच्च अधिकारी मॅसिमो ओसाना यांनी या शिल्पांच्या शोधाचे वर्णन प्राचीन भूमध्य सागराच्या इतिहासातील सर्वात आश्चर्यकारक शोधांपैकी एक असे केले आहे. रियास ब्राँझच्या शोधानंतर ओसानाने याचे वर्णन केले आहे. त्या काळात प्राचीन ग्रीक योद्ध्यांची एक मोठी जोडी सापडली होती. १९७२ मध्ये ते इटलीतील समुद्रकिना-यावरून काढण्यात आले होते. तबोली म्हणाले की, हायजिया, अपोलो आणि इतर ग्रीक-रोमन देवतांच्या या मूर्ती पूर्वी मंदिरांमध्ये होत्या. पण असे दिसते की पहिल्या शतकातच धार्मिक विधीमध्ये त्या मूर्ती गरम पाण्यात विसर्जित करण्यात आल्या असाव्यात. त्या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्या होत्या. कारण त्यांना पाण्यातून काहीतरी मिळेल अशी अपेक्षा होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या