29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeराष्ट्रीय३१ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

३१ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. दोन टप्प्यात हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असून, १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा घेण्याची शिफारस केली आहे, तर १४ मार्च ते ८ एप्रिलदरम्यान उर्वरित टप्पा घ्यावा, अशी शिफारस असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन अत्यंत महत्वाचे असणार आहे. या अधिवेशनात सादर होणा-या अर्थसंकल्पात या पाच राज्यांसह अन्य राज्यांना काय मिळणार, याकडे लक्ष लागून आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे दोन टप्प्यात होणार असल्याची माहिती मिळत आहे.

देशात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली. अर्थसंकल्पीय अधिवेशनावरदेखील कोरोनाचे सावट पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दोन्ही सभागृहांच्या महासचिवांना कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या सद्य परिस्थितीचा आढावा घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुचवण्याचे निर्देश दिले आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या