36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeराष्ट्रीय३१ मार्चपूर्वी आधार-पॅन लिंक करणे अनिवार्य

३१ मार्चपूर्वी आधार-पॅन लिंक करणे अनिवार्य

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बँँकेच्या खातेधारकांना बँंकेकडून नवीन नियमावली जाहीर होत असतात. तसेच आता भारतीय स्टेट बँकेने आपल्या खातेधारकांसाठी नुकतीच नवीन नियमावली जाहीर केली आहे. यासाठी त्यांनी ग्राहकांसाठीच्या महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. पॅन कार्ड आणि आधार कार्ड संदर्भात या सूचना दिल्या आहेत. यानुसार ग्राहकांनी आपल्या खात्याला ३१ मार्च २०२२ पर्यंत संलग्न केले नाही तर आपले खाते स्थगित केले जाणार आहे, असा इशारा बँकेने दिला आहे.

एसबीआयने आपल्या ट्वीटरवरुन ट्वीट करत सांगितले की, ग्राहकांनी सगळ्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी आपल्या खात्याला आधार आणि पॅन कार्ड लिंक करायला पाहिजे. तसेच कोणत्याही प्रकारच्या अडचणींपासून सुटका मिळवण्यासाठी आणि चांगल्या सेवेसाठी ग्राहकांनी आपल्या खात्याला आधार आणि पॅन लिंक करावे, असे ट्वीट करत म्हटले आहे. याअगोदर भारतातील मोठमोठ्या बँकेने खातेधारकांना आधार आणि पॅन लिंक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. हे काम करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. जर तुम्ही पॅन आणि आधार कार्ड लिंक नाही केले तर आपले अकाऊंट स्थगित केले जाऊ शकते, असा इशारा बँकांनी दिला आहे.

एसएमएसद्वारे लिंक करण्यासाठी
१) आपल्या फोनमधील मेसेजवर जा. त्यानंतर यूआयडीएआय १२ अंकी आधार क्रमांक> < १० अंकी पॅन क्रमांक>  लिहून हा मेसेज ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर पाठवा. यानंतर आपले आधार आणि पॅन आपल्या खात्याला संलग्र होईल. पण यासाठी तुम्ही ज्या नंबरवरुन हा मेसेज पाठवत आहात तो फोन क्रमांक बँकेला संलग्न असावा लागेल. जर तुमचा फोन बँकेला संलग्र नसेल तर तुम्ही दुसरी पद्धत वापरून लिंक करू शकता.

इनकम टॅक्स वेबसाईटवरून लिंक करा
१) सगळ्यात अगोदर वेबसाईट ओपन करा
२) त्यानंतर आपल्याला होमपेजच्या डाव्या बाजूला लिंक आधार हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा
३) त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल आणि त्यामध्ये आपल्याला नाव, आधार नंबर आणि पॅन नंबर टाकावा लागेल
४) त्यानंतर कॅप्चा कोड टाकून ओटीपीसाठी बटन दाबा
५) नंतर ओटीपी टाकून लिंक आधारवर क्लिक करा, अशाप्रकारे आपण आपले आधार खात्याला लिंक करू शकता

 

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या