36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeराष्ट्रीय५ दिवस थंडीची तीव्र लाट

५ दिवस थंडीची तीव्र लाट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताचा बहुतांश भाग सध्या थंडीने गारठला असून, गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा सतत घसरत आहे. अशावेळी भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवस थंडीचा जोर कायम असेल, अशी शक्यता वर्तविली आहे. त्यात उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात पुढील पाच दिवसांत किमान तापमानात सरासरी तीन ते पाच अंश सेल्सियसने घट होईल, असा अंदाज बांधण्यात आला आहे.

पंजाब, हरयाणा, दिल्ली, उत्तराखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांतील काही भागांत पुढील दोन ते तीन दिवस कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी पुढील पाच दिवसांत पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातमधील काही भागांत थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. देशातील पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, सिक्कीम, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांत काही भागांत दाट धुके पडेल, असेही हवामान विभागाने सांगितले आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांत आताच पारा घसरून हूडहुडी भरू लागली आहे. मंद वा-यांमुळे थंडी अस झाली आहे. अशावेळी हवामान विभागाने दिलेला ताजा अलर्ट महाराष्ट्राच्याही काळजीत भर टाकणारा ठरला आहे.

३-५ अंशावर घट होण्याची शक्यता
पुढील ५ दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात ३ ते ५ अंश सेल्सियस इतकी हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. त्यातही २५ व २६ जानेवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, थंडीची लाट येण्याची शक्यता आहे, असे ट्वीट कृष्णानंद होसाळीकर यांनी केले आहे.

महाराष्ट्रात पारा घसरला
नाशिक- ६.६, जळगाव- ९.२, मालेगाव- ९.६, बारामती- १२.५, पुणे- १०.४, चिकलठाणा- १०.२, परभणी- १२.९, नांदेड- १४.६, ठाणे- १९, कुलाबा- १६.२
सांताक्रूझ-१५, माथेरान- ७.६, महाबळेश्वर- ६.५, डहाणू- १३.६, हर्णे- १७.१, सोलापूर- १४, कोल्हापूर- १६.१, उस्मानाबाद- १४.७, सांगली- १६.४.
——————–

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या