27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयअंत्यसंस्काराची व्यवस्था करा

अंत्यसंस्काराची व्यवस्था करा

एकमत ऑनलाईन

बंगळुरू : कर्नाटकातील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि प्रसिद्ध पुरोगामी साहित्यिक के. वीरभद्रप्पा यांच्यासह ६४ जणांना जीवे मारण्याची धमकी देणारे मेसेज आले आहेत. हे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिस विभागाने बंदोबस्त कडेकोट करण्याचा विचार केला आहे.
कर्नाटकात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या मेसेजमध्ये म्हटले आहे की, “तुमच्या अवतीभोवती मृत्यू लपला आहे, मरण्यासाठी तयार राहा. तुम्ही विनाशाच्या वाटेत आहात. मृत्यू तुमच्या अगदी जवळ आहे. तुम्ही तयार राहा. मृत्यू तुम्हाला कोणत्याही रूपात मारू शकतो. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना कळवा आणि तुमच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करा”. दरम्यान, मेसेज पाठवणा-या अज्ञातांनी स्वत:ला सहिष्णू हिंदू असल्याचे म्हटले आहे.

धमक्यांना हलक्यात घेऊ नका : एच डी कुमारस्वामी
माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी सरकारला अशा प्रकारच्या धमक्यांना हलक्यात घेऊ नका, असा इशारा दिला आहे. तसेच, सत्ताधारी भाजपावर निशाणा साधत पुरोगामी विचारवंत व लेखक के. वीरभद्रप्पा आणि राज्यातील जातीय ध्रुवीकरणावर सरकारच्या मौनाचा निषेध करणा-या इतर लेखकांना सुरक्षा पुरवण्याचे आवाहन एचडी कुमारस्वामी यांनी केले आहे.

राज्याच्या विकासाने चिंता निर्माण केली
राज्याच्या विकासाने चिंता निर्माण केली असल्याचे कार्यकर्ते आणि लेखक प्रा. एम.एम यांनी म्हटले आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हिजाबचा वाद आणि मुस्लिम संघटनांनी केलेल्या निदर्शनानंतर हिंदू संघटनांनी मंदिरांमध्ये मुस्लिम व्यापारी, मुस्लिम मूर्तिकार, सामान्य व्यापारी आणि अगदी वाहनचालक आणि वाहतूक कंपन्यांनी बनवलेल्या मूर्तींवर बंदी घालण्याची विनंती केली. दरम्यान, या घडामोडींसाठी विरोधी पक्ष काँग्रेस आणि जेडी(एस) यांनी सत्ताधारी भाजपला जबाबदार धरले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या