22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeराष्ट्रीय८५ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस

८५ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात लसीकरणाचा वेग वाढला असून, आतापर्यंत ८५ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती देत देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास या भूमिकेतून कोरोनाविरुद्ध सक्षमपणे लढा दिला जात आहे. यात भारताने ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे.

भारतात सोमवारपर्यंत १२८.६६ कोटी लोकांना लस दिली गेली आहे, तर आज सायंकाळपर्यंत देशात ७१ लाख लोकांना लसीचे डोस दिले गेले. यापेक्षा अधिक वेगाने लसीकरण करण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे. आधून-मधून कोटीचा आकडा ओलांडला जात आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या