27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीय८ वर्षांत इंधनाचे दर भडकले, पेट्रोल ४५, डिझेलमध्ये ७५ टक्के वाढ

८ वर्षांत इंधनाचे दर भडकले, पेट्रोल ४५, डिझेलमध्ये ७५ टक्के वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात इंधन दरवाढीमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. देशातील अनेक शहरात पेट्रोल शंभरीपार गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून गेल्या ८ वर्षांत पेट्रोलच्या दरात ४५ टक्के आणि डिझेलच्या दरात तब्बल ७५ टक्के वाढ झाली आहे. २०१४ मध्ये मोदींनी पेट्रोल- डिझेलच्या किमतीवरून कॉंग्रेसवर टीका केली होती. आम्ही सत्तेत आल्यानंतर महागाई कमी होईल, असे आश्वासनही दिले गेले. मात्र, आताच्या किमती पाहता ८ वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा मोदींना विसर पडला काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीवरून विरोधक आक्रमकपणे टीका करीत आहेत. मात्र, सरकारी कंपन्या दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमती वढवत आहेत. २०१४ साली जेव्हा मोदी सरकार सत्तेत आले, त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ११० डॉलर प्रतिबॅरेल असे होते. त्यावेळी पेट्रोल ७२ रुपये लिटर आणि डिझेल ५५.४८ रुपये लिटर होते. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १६ रुपयांचे अंतर होते. आता पेट्रोल राजधानी दिल्लीत १०५.४१ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल ९६.६७ रुपये प्रतिलिटर या दराने विक्री होत आहे. ही आकडेवारी पाहता गेल्या ८ वर्षांत पेट्रोल ४५ टक्के आणि डिझेल ७५ टक्के महाग झाले आहे.

दर कमी होऊनही फायदा नाही
आंतरराष्ट्रीय बाजारात जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या, त्यावेळी नोव्हेंबर २०१४ ते जानेवारी २०१६ दरम्यान मोदी सरकारने ९ वेळा पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटीमध्ये वाढ केली. पेट्रोलवर ११.७७ रुपये आणि डिझेलवर १३.४७ रुपये प्रतिलिटर दराने एक्साईज ड्युटी वाढवली. दरम्यान कोरोना काळात मागणीअभावी कच्च्या तेलाचे दर कमी झाले. त्यानंतर मार्च २०२० ते आतापर्यंत पेट्रोलच्या दरात १३ रुपये आणि डिझेलच्या दरात १६ रुपये एक्साईज ड्युटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेसच्या नावाखाली टॅक्स वाढवण्यात आला. ४ नोव्हेंबर २०२१ अगोदर मोदी सरकार पेट्रोलवर ३२.९० आणि डिझेलवर ३१.८० रुपये एक्साइज ड्युटी वसूल करत होती. परंतु ५ राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवरील १० रुपये एक्साईज ड्युटी कमी केली. जानेवारी २०२० मध्ये रशिया-युक्रेन युद्धाचा फटका बसला आणि कच्च्या तेलाचे दर १३० डॉलर प्रतिबॅरलवर पोहचले. त्यानंतर सरकारी तेल कंपन्यानी पेट्रोल डिझेलच्या दरात १० रुपये प्रतिलिटर वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीत सर्वसामान्यांना दिलेला दिलासा अल्पकालीक ठरला.

 

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या