22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeमहाराष्ट्रअखेर महाराष्ट्राच्या देखाव्याला परवानगी

अखेर महाराष्ट्राच्या देखाव्याला परवानगी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : यंदा प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार होता. परंतु सुरक्षेच्या कारणावरून केंद्र सरकारने या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आली होती. आता पुन्हा केंद्राने आपला निर्णय बदलला असून राजपथावरील संचलनात महाराष्ट्राच्या देखाव्याला अखेर परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

महाराष्ट्राच्या चित्ररथावर यंदाच्या देखाव्यातून राज्यातील जैवविविधतेचे दर्शन घडवले जाणार आहे. जैवविविधतेची मानके या विषयावर आधारित चित्ररथ तयार करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यप्राणी, राज्यपक्षी यांसह महाराष्ट्रात आढाळणा-या विविध सजीव प्रजातींचा समावेश असणार आहे. महाराष्ट्राचा चित्ररथ हा नेहमीच राजपथावरील संचलनाचे आकर्षण राहिला आहे. आता महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा सर्वोत्तम ठरणार का, हे देखील पाहावे लागेल. प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार होता. त्यासाठी जैवविविधतेची मानके या विषयावर आधारित चित्ररथ तयार करण्यात आला होता. मात्र, केंद्र सरकारने या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आली. सुरक्षेच्या कारणावरून ही परवानगी नाकारल्याचे समजते. प्रजासत्ताक दिनासाठी दिल्लीतील राजपथावर वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ सहभागी होतात. त्यामध्ये महाराष्ट्राचाही चित्ररथ असतो. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या