37.8 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeराष्ट्रीयदेशात रुग्णसंख्येत चढउतार

देशात रुग्णसंख्येत चढउतार

एकमत ऑनलाईन

९० हजार रुग्णांची भर, १३ लाखांवर सक्रीय रुग्ण
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. देशात शुक्रवारी सक्रिय रुग्णांचा आकडा १३ लाखांच्या पार गेला. संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत देशात ९० हजार ५४२ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली, तर दिलासादायक बाब म्हणजे आज ३६ हजार ८८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली, तर ६३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
देशात सध्या १३ लाख १९ हजार ७८९ सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यावर देशातील विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. कोरोना या भयावह विषाणूने आतापर्यंत सुमारे ३ कोटी ४८ लाख जण विळख्यात सापडले आहेत, तर ४ लाख ८५ हजार ४१३ जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.
दिल्लीत गेल्या २४ तासात २४ हजार ३८३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. मागील दोन दिवसांच्या तुलनेत आजच्या आकडेवारीत घसरण पाहायला मिळाली आहे, तर ३४ जणांचा गेल्या २४ तासात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर २६ हजार २३६ जणांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
महाराष्ट्रात ४३ हजार नवे रुग्ण
मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी मुंबईसह महाराष्ट्रात ओमिक्रॉनची लाट आल्याचे आजच्या आकडेवारीवरून तूर्तास तरी दिसते. राज्यात शुक्रवारी ४३, २११ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर २३८ ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली. एकट्या पुण्यातच गेल्या २४ तासांत १९७ ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे, तर मुंबईत आतापर्यंत एकूण सहाशेहून अधिक ओमिक्रॉनबाधित रुग्ण आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या